Mumbai Sanjay Raut ED Custody Issue In Court : संजय राऊतांची कोठडी वाढणार की जामीन मिळणार?
Continues below advertisement
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. पत्राचाळ प्रकरणी राऊतांना देण्यात आलेली ४ दिवसांची ईडी कोठडी आज संपतेय. रविवारी रात्री उशीरा ईडीने संजय राऊतांना अटक केली होती. त्यानंतर सोमवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्यांना ४ दिवसांची ईडी कोठडी दिली होती. ही मुदत आज संपलेय... दरम्यान त्यांच्या कोठडीसाठी ईडीकडून आज जोरदार युक्तीवाद केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राऊतांना कोर्टाकडून दिलासा मिळणार का याक़डेही राज्याचं लक्ष असणार आहे.
Continues below advertisement