MNS Adhiveshan | मनसेच्या महाअधिवेशनाचं प्रसारण रोखण्यासाठी वीजपुरवठा बंद, संदीप देशपांडे यांचा आरोप
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकासआघाडी सरकारवर आरोप केला आहे. मनसेच्या महाअधिवेशनाचं प्रसारण होऊ नये यासाठी राज्यभरातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. तर, एमएसईबीने मेन्टेनन्सच्या कामासाठी अनेक ठिकाणी उद्या सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहिल, अशा आशयाचा मेसेज केला आहे आणि तो मेसेज दाखवूनच देशपांडेंनी सरकारवर आरोप केला आहे.