Mumbai: मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत, गुणवत्ता निर्देशांक 500 अंकांच्या पार
सौराष्ट्राकडून धूलिकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेत मोठ्या प्रमाणावर धूलिकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या दहा वर्षांतील मुंबईतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली आहे. सहा ते सात अंशानी कमाल तापमानात काल घट झाली असल्याचं पाहिलं मिळालं. रविवारी सरासरीच्या तुलनेत विक्रमी घट दिसून आली. कुलाबा येथे 24 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 23.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत दोन्ही ठिकाणी अनुक्रमे 6 आणि 7 अंशांची घट झाली होती. हे गेल्या 10 वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमान आहे.