Mumbai Corona Update: मुंबईत आज 13,648 कोरोना रुग्णांची नोंद,कालच्या तुलनेत रुग्णसंख्या 6,000 ने कमी

मुंबई: ओमायक्रॉनला सामोरं जाण्यासाठी मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज आहे. रूग्णवाहिका, रुग्णालयातील बेडची उपलब्धता, ऑक्सिजनचा पुरवठा तसेच आतापर्यंत झालेल्या लसींची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सोमवारी पालिकेच्या वतीनं हायकोर्टात सादर केल गेलं. देशासह राज्यात सध्या कोरोनाचा 'ओमायक्रॉन' हा विषाणु धोक्याची घंटा ठरतोय, मुंबईच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. या विषाणुपासून मुंबईतील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं कोणतीही कसर ठेवणार नाही, आणि राज्य सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची ठोस अंमलबजावणी होईल. अशी अपेक्षा व्यक्त करत यावर पुढील सोमवारी सुनावणी घेण्याचं मुंबई उच्च न्यायालयानं निश्चित केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola