Mumbai : Rani Baug : राणीच्या बागेतील निविदा प्रक्रियेतील कथित घोटाळ्याची चौकशी थांबवली

Continues below advertisement

मुंबईतील वीर जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतील पिंजऱ्याच्या निविदेतील कथित अनियमिततेची चौकशी करण्यास परवानगी नाकारण्यात आलीय.. मुंबई महापालिकेनं ही परवानगी नाकारल्यानं चौकशी बंद करत प्रकरण दफ्तरी दाखल केल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं म्हटलंय..   प्राणीसंग्रहालयात नवीन प्राण्यांच्या पिंजऱ्याच्या बांधकामासाठी  291 कोटी रुपयांच्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नगरसेवक विनोद मिश्रांनी केला होता.. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाकेनं एसीबीला पत्र लिहून चौकशी करण्यास सांगितलं होतं. मात्र मुंबई महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या विरोधात चौकशीसाठी पालिकेनं परवानगी नाकारली आहे...दरम्यान चौकशीला परवानगी का नाकारली याबाबत आम्ही मुंबई महापालिकेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram