Rani Bagh | मुंबईच्या राणीच्या बागेत वार्षिक उद्यान प्रदर्शन | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईच्या राणीच्या बागेतील प्राणी आणि पक्ष्यांना आता आणखी जवळून न्याहाळता येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्राणी-पक्षी सहा दालनांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणारय. भारतात पहिल्यांदाच होत असलेले पक्ष्यांसाठीचे वैशिष्ट्यपूर्ण 'मुक्त विहार' दालनही यात असणार आहे. या 'मुक्त पक्षी विहारा'त विविध प्रजातींचे सुमारे 100 पक्षी एकत्र नांदणार आहेत. या मुक्त विहारात असलेल्या पुलावरुन पक्ष्यांना जवळून न्याहाळण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. इतर ५ दालनांमध्ये बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा, कासव यांचा समावेश आहे. हे प्राणी अधिक जवळून बघता यावेत यासाठी या दालनांच्या दर्शनी भागात वैशिष्ट्पूर्ण काच बसविण्यात आलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram