Mumbai Rainे Updates : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडीला धो धो धुतलं...रस्त्यांना नदीचं स्वरुप

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. चेंबूरमध्ये सर्वाधिक १७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अनेक भागांतील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. इमारतींचे पहिले मजले पाण्याखाली गेले असून, नागरिकांना घरे रिकामी करावी लागली आहेत. अनेक वाहने पाण्यात अडकली आहेत. मा रुग्णालयाच्या परिसरातही पाणी भरले होते. किंग्ज सर्कल परिसरात एक School Bus पाण्यात अडकली होती, मुलांना बाहेर काढण्यात आले. सायन, हिंदमाता, हिंदू कॉलनी या सखल भागांमध्येही पाणी साचले होते. दादर पूर्व भागातील हिंदू कॉलनी आणि रेल्वे स्थानकाजवळील रस्ता बंद करण्यात आला होता. नवी मुंबईतही पावसाचा जोर होता. वाशीतील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते, तर APMC Market मध्ये गुडघाभर पाणी साचले होते. पावसाचा जोर पाहता नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पनवेलमध्येही संततधार पाऊस सुरू होता. ठाण्यात वृंदावन सोसायटी आणि शेना गाव परिसरात पाणी साचले. कळव्यात बोटीने काही मुलांना वाचवण्यात आले. कल्याण-डोंबिवलीलाही पावसाने झोडपले, कल्याण पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरले. भिवंडीत कामवारी नदीची पातळी वाढली, बाजारपेठेत पाणी साचले. एका नागरिकाने "हर साल यही हालत, हर साल यही हालत" असे म्हणत प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola