Mumbai Rains | मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हिंदमाता परिसरात पाणी साचलं
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कुलाबा, दादर, सांताक्रूझ आणि अंधेरी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे हिंदमातासारख्या सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. आज आणि उद्या मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.