Mumbai Rain Kurla Local Railway : कुर्ल्यात लोकल ट्रॅकवरही पाणी अजूनही कायम, पाण्यातून रेल्वे वाहतूक

Continues below advertisement

 

Mumbai Rain Updates: मुंबई : मुंबईसह (Mumbai Rain Updates) संपूर्ण महाराष्ट्रावर (Maharashtra Monsoon) वरुणराजानं कृपादृष्टी केल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, पुढचे तीन ते चार तास मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी लोकल सेवा धीम्या गतीनं सुरू आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुसळधार पावसानं घातलेल्या धुमाकुळामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram