Mumbai Rains | पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली, दादरमध्ये रेल्वे रुळांवर पाणी, लोकल सेवा उशिरा
मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली आहे. दादर स्थानकातील रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे लोकल सेवा सध्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे. "पाऊस जर असाच सुरू राहिला तर रेल्वे सुद्धा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे." अशी माहिती समोर आली आहे. आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मुंबईच्या जीवनवाहिनीवर पावसाचा परिणाम होत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांना प्रवासाचे नियोजन करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.