Mumbai Rains | ठाण्यात मुसळधार पाऊस, वाहतूक धीम्या गतीने; Orange Alert जारी
ठाणे शहरात मध्यरात्रीपासून अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरातही पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे ठाण्यातील तीन हात नाका ते आनंदनगर टोलनाका दरम्यान वाहतूक संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. घोडबंदर रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कामावर जाणाऱ्या नागरिकांना पावसातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. हवामान विभागाने ठाण्यासाठी Orange Alert जारी केला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. तीन हात नाका ब्रिज आणि कोपरी ब्रिज परिसरातही वाहतूक संथ आहे. वाहने हळू हळू पुढे सरकत आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.