Mumbai Rains | मुंबईत जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा; Central Railway उशिरा, घराबाहेर पडू नका!
Continues below advertisement
सीएसएमटी परिसरातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी सोसाट्याचा वारा सुरू आहे. पुढील काही तासांत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. इतर दिवशी गजबजलेला हा परिसर आज मात्र कमी गर्दीचा दिसत आहे, कारण प्रशासनाने 'काम असेल तरच घराबाहेर पडा' असे आदेश दिले आहेत. यामुळे बहुतांश मुंबईकरांनी बाहेर पडणे टाळले आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे, त्यामुळे रस्त्यांवरील गर्दी कमी झाली आहे. अनेक ठिकाणी आजही पाणी भरलेले आहे. पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला असून, वाऱ्याचा वेगही वाढताना दिसत आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या जवळपास अर्धा तास उशिराने धावत आहेत. विशेषतः सायन आणि दादर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेला खोळंबा होत आहे. पुढील दोन ते तीन तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. 'नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं' असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement