Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश, 7 ते 8 जणांना काढलं बाहेर!
abp majha web team
Updated at:
13 May 2024 06:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGhatkopar Hoarding Falls : मुंबईमध्ये आज दुपारी आलेल्या वादळानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अवघ्या मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. मुंबईत दुपारी तीन वाजल्यापासून धुळीचे वादळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. सर्वात मोठी दुर्घटना घाटकोपरमध्ये (Ghatkopar Hoarding Falls) घडली.घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपवर महाकाय असे अनधिकृत 120 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग कोसळून तब्बल 80 हून गाड्या आणि 100 हून अधिकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 35 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.