Mumbai Rains: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट, अधिकाऱ्यांना दिले आदेश
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
09 Jun 2021 05:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईसह उपनगरात आज मान्सूनचं दमदार आगमन झालंय. पहिल्याच पावसाने शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. तर रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झालीय. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यासमवेत आपत्ती नियंत्रण कक्षात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी गाडीतूनच मुंबईची पाहणी केली.