Mumbai Rain | मुंबईत पावसाचं रौद्ररूप; पावसाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रेल्वे रुळावर पाणी आल्याने लोकलही अडकल्या होत्या. एनडीआरएफ जवानही मदतकार्यात गुंतले आहे. शिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने येत्या 24 तासास मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola