Mumbai Rain : मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, पुढील 24 तासांत कोकणातही अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई आणि कोकणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात येत आहे. त्यात मुंबईकरांसाठी पुढचे तीन तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. कारण पुढच्या तीन तासांत मुंबईत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईला गेल्या 4 तासांपासून पावसांन झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola