Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून उद्या (गुरूवार) सकाळी 8.30 पर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाण्यासह परिसरात गुरूवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारीही मुंबईकरांना मुसळधार पावसाला सामोरं जावं लागणार आहे.
आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा
मुंबईतील अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
लोकल सेवा ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी
मुंबईत आज दिवसभर पावसाची हजेरी आहे. संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मुंबई लोकल सेवेवर झाल्याचं दिसलं.मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहे तर पश्चिम रेल्वे 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहे. विक्रोळी, कांजूर, भांडुप या स्टेशन दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे घाटकोपर स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं.
घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. गेल्या तासाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे स्टेशन परिसरात पाणी साचलं आहे.