Mumbai Rain : मुंबईतील हवामान विभागाचं रडार अद्यापही नादुरुस्तच
Continues below advertisement
तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानानंतर धडा न घेता अजूनही मुंबईतील हवामान विभागाचे रडार बंदच आहे. पुढील 7 दिवसांत नवे रडार कार्यान्वित होणार असून अभियंते जुन्या रडारवर काम करत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहोपात्रा म्हणाले, "नव्या रडारवरुनच आम्ही अचूक माहिती देत आहे. हवामान अभ्यासक आणि सर्वांसाठी हे रडार पुढील 7 दिवसानंतर उपलब्ध होणार आहे. डॉपलर रडार जरी बंद असले तरी मुंबईतील 60 ठिकाणींवरील पावसाच्या नोंदी आणि अचूक अंदाज देत आहे. जुन्या रडारच्या दुरुस्तीबरोबरच नवं सी1 रडार देखील लवकरच कार्यान्वित होणार आहे."
Continues below advertisement