Mumbai Rain | मुंबईकरांनी अनुभवला 'हिवसाळा'; ऐन थंडीच्या मोसमात मुंबईसह अनेक भागांत पावसाच्या सरी
Continues below advertisement

ऐन थंडीच्या मोसमात मुंबईत पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबईतील वडाळा परिसरात पाऊस बरसत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. वर्षाअखेरीस नाताळच्या तोंडावर जिथं थंडीनं हुडहुडी भरते, त्यावेळी मुंबईत मात्र पावसाच्या तुरळक सरी कोसळताना दिसत आहेत. अरबी समुद्राच्या काही भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून तीन ते चार दिवस कोकणासह, केरळमध्येही काही भागांत पावसाच्या काही हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.