Mumbai Rain : मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha

Mumbai Rain : मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha

हे देखील वाचा

मुंबई :  महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे चाणक्य अमित शाह (Amit Shah)  यांची मंगळवारी  महायुतीची बैठक पार पडली.  या बैठकीनंतर अद्याप 90 विधानसभा जागांवर तिढा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागावाटपासंदर्भात महायुतीची लवकरच दिल्लीत बैठक होणार आहे. महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीत येण्याची शक्यता आहे.

अमित शाहा यांनी तिढा असणाऱ्या जागांवर दोन दिवसात  मिटींग करून तीन पक्षाचे नेते तोडगा काढावा अशा सूचना केल्या आहेत.  उद्याच महायुतीच्या नेत्यांची पुन्हा बैठक पार पडणार  आहे.  विद्यमान  आमदारांच्या जागा या त्या-त्या पक्षातील विद्यमान आमदारांना देण्यात येतील. तसेच जिथ भाजपाचा आमदार कमकुवत असेल अशा जागा  महायुतीतील अजित पवार एनसीपी आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांना प्राधान्य असेल.

महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत पुन्हा बैठक होणार

महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत पुन्हा बैठक होणार आहे.   अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ज्या जागांबाबत अजूनही निर्णय झालेला नाही.  त्या जागांबाबत उद्या पुन्हा एकदा महायुतीच्या बैठकीत तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे.  बैठकीची वेळ अद्याप ठरलेली नाही.  बैठकीला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहतील. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola