Mumbai Rains | मुंबईत बुधवारी एकाच दिवसात 328 मिमी पावसाची नोंद; NDRF कडून 290 प्रवाशांची सुटका
मुंबईत मागील दोन दिवसांपासून अक्षरशः पावसाने थैमान घातलं आहे. काल दुपारपासून सुरु झालेल्या पावसामुळे आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरिल बिल्डिंग वरील पत्रे उडून गेल्याचं पाहिला मिळालं. मुंबईतील सायन, दादर, माटुंगा, परेल, मुंबई सेंट्रल, मशिद बंदर या भागात तर कमरेएवढे पाणी असल्याचं चित्र होतं. याचा फटका अनेक कुटुंबाना बसला होता. महत्त्वाची बाब ही आहे कीं मागील 45 वर्षात ऑगस्ट महिन्यांत पडलेला सर्वाधिक पाऊस म्हणून या पावसाची नोंद झालीय. काल मुंबईत तब्बल 328.8 मिलिमीटर पाऊस इतकी पावसाची नोंद झाली आहे. आज देखील मुंबईला हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 24 विभागांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कालच्या पावसामुळे परिस्थिती इतकी वाईट झाली होती कीं त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं. काल लोकल मध्ये अडकलेल्या तब्बल 290 प्रवाशांची सुटका एनडीआरएफच्या जवानांनी केली .