Harbour Railway Megablock : हार्बर मार्गावर पुढील 22 दिवस रात्रकालीन ब्लॉक : ABP Majha
आजपासून म्हणजे ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत हार्बर मार्गावर २२ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या कामासाठी हा रात्रकालीन ब्लॉक घोषीत केलाय. पनवेल यार्डमध्ये रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील रात्री उशिरा धावणाऱ्या आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.