Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच आठपदरी होणार : ABP Majha

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच आठपदरी होणार आहे. तसा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारला दिलाय. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलाय. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा मार्ग आठ पदरी करणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलाय. सरकारने प्रस्तावाला मंजुरी दिल्यास वर्षभरात कामाला सुरुवात होऊ शकेल. एकीकडे, वेगानं काम सुरू असलेला मिसिंग लिंक प्रकल्प, आणि दुसरीकडे आठ लेन करण्याचा प्रस्ताव, यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्यांसह सातारा, कोल्हापूर, कोकण आणि गोव्यात जाणाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळेल.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola