Mumbai Pune Traffic : मुंबई-पुणे एक्प्स्प्रेसवेवर दोन ठिकाणी कोसळी दरड, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
मुंबई-पुणे एक्प्स्प्रेसवेवर काल रात्रीत दोन ठिकाणी दरडी कोसळल्या. आडोशी बोगदा आणि लोणावळ्याजवळ दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक बराच वेळ ठप्प होती. सध्या दोन लेन सुरू करण्यात आल्य़ा आहेत. सध्या केवळ चारचाकी गाड्यांना सोडण्यात येतंय. अवजड वाहनांना लोणावळ्याच्या आधीच थांबवून ठेवण्यात आलं आहे. वाहतूक सुरू असली तरी वाहनांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे लोणावळा घाटात वाहतूक कोंडी झाली आहे.