Mumbai मध्ये मालमत्ता करातील वाढ टळली, मुंबईकर नागरिकांना मोठा दिलासा : ABP Majha
Continues below advertisement
कोरोनाच्या संकटात मुंबईतल्या मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळं मालमत्ता करातील वाढ पुढचं वर्षभर टळली आहे. ((मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. )) पण या निर्णयामुळं महापालिकेला एक हजार ४२ कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. मुंबई महापालिका कायद्यानुसार दर पाच वर्षांनी भांडवली मूल्यात सुधारणा केली जाते. परिणामी मालमत्ता करात वाढ होते. मुंबईत याआधी २०१५ मध्ये मालमत्ता कर वाढवण्यात आला होता. त्यानंतर २०२० मध्ये ही वाढ होणं अपेक्षित होतं. पण कोरोनाच्या संकटामुळं भांडवली मूल्यात सुधारणा आणि करवाढीचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
Continues below advertisement