Mumbai Property Tax : निवडणुकीच्या मालमत्ता कर वाढण्याची शक्यता, दर 5 वर्षांनी होते वाढ
Continues below advertisement
मुंबईत निवडणुकीच्या तोंडावर मालमत्ता कर वाढवला जाण्याची शक्यता आहे. मुंबईत दर ५ वर्षांनी मालमत्ता करात वाढ केली जाते. पण कोरोना काळात मालमत्ता करवाढीचा निर्णय टाळण्यात आला होता. त्यातच आता नगरसेवकांची मुदत संपल्यानं प्रशासकामार्फत कारभार सुरु आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा दबाव नसल्यानं प्रशासक मालमत्ता करवाढीचा निर्णय घेणार का याकडे लक्ष लागलं आहे. नगरसेवकांचा दबाव नसल्यानं आता थकीत मालमत्ता कराच्या वसुलीलाही प्रशासनानं सुरुवात केली आहे.
Continues below advertisement