Mumbai Power Cut | ग्रीड फेल झाल्याने खोळंबलेली लोकलसेवा पुन्हा सुुरु
Continues below advertisement
ग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. याचा रस्ते वाहतुकीसह आणि लोकल सेवेला फटका बसला. तसेच ऑनलाईन वर्ग रद्द तर झाले तर परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यानं कोविड हॉस्पिटलचा पॉवर बॅकअप सुरु करा अशा सूचना पालिका आयुक्तांनी तर मंत्रालयासह सरकारी कार्यालयं, बँका, कोर्ट काही काळ अंधारात गेल्याचं चित्र होतं. अनेक ठिकाणी यामुळं पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला.
Continues below advertisement