Portable Oxygen Can | आता स्वत:सोबत बाळगा ऑक्सिजनचा 'कॅन'; काय आहे पोर्टेबल ऑक्सिजन कॅन?
मुंबईसह राज्यात सध्या कोरोनारुग्ण झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अश्यातच नागरिक खाजगी ऑक्सिजन वितरकांकडून ऑक्सिजन सिलेंडर घेण्यास रांगा लावत आहे. यात आता नागरिकांसाठी पोर्टेबल ऑक्सिजन कॅन ही उपलब्ध होऊ लागले आहेत. या अगोदर परदेशात खेळाडू , गिर्यारोहक हे कॅन ऑक्सिजनची पातळी तातडीने वाढविण्यासाठी वापरत होते. मात्र कोरोना काळात आता या पोर्टेबल ऑक्सिजन कॅनला ही मोठी मागणी वाढली आहे. ब्रिजो 2 या कंपनीने असे ऑक्सिजन कॅन मोठ्या प्रमाणात बनविण्यास आणि विक्रीस सुरुवात केली आहे. या पोर्टेबल कॅनमध्ये 12 लिटर इतकी ऑक्सिजन ची क्षमता असून काही तास रुग्णाला हा कॅन ऑक्सिजन पुरवठा करून ऑक्सिजन पातळी वाढविते. हा छोटासा कॅन आपण कुठे ही बॅग मध्ये, वाहनात घेऊन फिर शकतो. तसेच याची कॅप मास्क असल्याने कोणत्या ही क्षणी त्याचा वापर तात्काळ करू शकतो. या कॅनला राज्यभरात आता मागणी वाढत आहे. याचा आढावा घेत हे कॅन बनविणाऱ्या विनोद शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी..