Mumbai police: पोलिसांमुळं महिलेचा जीव वाचला! ABP Majha

Continues below advertisement

गेट वे ऑफ इंडिया येथे समुद्रात बुडणाऱ्या एका महिला पर्यटकाला मुंबई सागरी पोलिसांच्या पथकानं वाचवलं आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. त्यावेळी समुद्रातून बोटीनं एलिफंटा आणि मांडवाला प्रवास करतात. अशाच एका बोटीतून प्रवास करत असताना समुद्राच्या लाटेच्या जोरदार धडकेमुळे एक महिला पर्यटक समुद्रात पडली होती. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचं सागरी सुरक्षा दल सतर्क झालं आणि स्पीड बोटीनं घटनास्थळ गाठलं. यावेळी या महिलेला दोरखंड देत तिचा जीव वाचवला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram