Mumbai : अंधेरीत बारवर छापा, मेकअप रुममधील आरशामागील छुप्या खोलीचा पर्दाफाश, 17 बारबालांना अटक

आता बातमी आरशामागे दडलेल्या एका रहस्याची... हा आरसा होता मुंबईतल्या अंधेरीमधल्या एका बारचा..जेव्हा जेव्हा पोलीस अंधेरीतल्या दीपा बारवर छापा मारायचे तेव्हा तिथल्या बारबाला क्षणार्धात गायब व्हायच्या.. काल देखील मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेनं छापा मारला. सुरुवातीला पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही... अखेर पोलिसांची नजर भल्या मोठ्या आरशाकडे खिळली. आरशाचा आकार गरजेपेक्षा मोठा दिसल्यानं पोलिसांनी त्यावर हातोडा चालवला.. या आरशामागे बारबालांना लपवण्यासाठी छुपी खोली तयार करण्यात आली होती... तसंच पोलिसांचा छापा पडताच बारबालांना बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्गही तयार करण्यात आला होता.. जवळपास १५ तास चाललेल्या या कारवाईनंतर पोलिसांनी १७ बारबालांना अटक केली आहे. तसंच बारचा मॅनेजरसह तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola