Mumbai Police Year Ending 2022 : नववर्षांच्या स्वागताला गालबोट टाळण्य़ासाठी मुंबई पोलीस सज्ज
नववर्षांच्या स्वागताला गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिस सज्ज झालेत. २५ डीसीपी, ७ अतिरिक्त आयुक्त, १५०० अधिकारी आणि सुमारे दहा हजार पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. त्याचसोबत राज्य राखीव पोलिस दलाच्या ४६ तुकड्याही तैनात केले जाणारेत. यंदाच्या ३१ डिसेंबरसाठी मुंबई पोलिस मोठा फौजफाटा तैनात करणार आहेत.