Mumbai Police Operation All Out : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईत ऑपरेशन ऑलआऊट
Continues below advertisement
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईत काल ‘ऑपरेशन ऑलआऊट’ राबवण्यात आले. मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमधील महत्त्वाच्या ठिकाणी नाका बंदी तैनात करण्यात आली होती व वाहतूक नियमांचा उल्लंघन करणाऱ्या मोटर वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तसेच पोलिसांचा या कारवाईत कोम्बिंग ऑपरेशन, वाँटेड, फरार आणि तडीपार गुन्हेगाराचा शोध सुरू होता. मुंबईत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी रेल्वे स्टेशन, लॉज, हॉटेल्स यांसारख्या संवेदनशील ठिकाणांचीही तपासणी केली. "ऑपरेशन ऑल आउट" रात्री 11 च्या सुमारास सुरू झाले आणि पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होते.
Continues below advertisement