Mumbai Police Security : अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर मुंबईत पोलिसांकडून लाँग मार्च...
एका अफवेनंतर महाराष्ट्रातील काही भागात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मुंबईतल्या तणाव निर्माण होईल अशा परिसरांमध्ये मुंबई पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या भागातील नागरिकांशी संवाद साधत पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. जे जे मार्ग पोलिसांनी मार्च काढत लोकांशी संवाद साधला आहे. तर विक्रोळीतील पार्क साईट परिसरातही पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.