Mumbai Bomb Blast Threat News : अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार, धमकीचा फोन
abp majha web team
Updated at:
19 Oct 2022 05:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Bomb Blast Threat News : अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट (Bomb Blast) होणार असल्याचा धमकीचा फोन पोलीस हेल्पलाईन (police helpline) नंबर 112 वर आला आहे. हा फोन कुणी केला याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. पण धमकीच्या फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हेल्पलाईनला फोन करणाऱ्याने असा दावा केला आहे की, अंधेरी येथील इनफिनिटी मॉल (Infiniti Mall Mumbai), जूहू येथील पीव्हीआर (PVR Mall) आणि सहारा हॉटेल (Sahara Hotel) एअरपोर्ट येथे बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Threat Call) होणार आहे.