New Year Celebration Mumbai : मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईतील समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली
नवीन वर्ष संपूर्ण शहरात शांततेत साजरे व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईतील समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांनी 18 बोटी सागरी सीमेवर तैनात केल्या आहेत. 18 बोटींपैकी 16 बोटी महत्त्वाच्या ठिकाणी तर 2 बोटी स्टँडबाय ठेवण्यात आल्या आहेत. गेटवे ऑफ इंडिया- ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, वांद्रे ताज लँड, जुहू चौपाटी, अक्सा बीच, ट्रॉम्बे माहुल जेट्टी, भाऊचा धक्का आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर नौका तैनात करण्यात आल्या आहेत.