Ravi Pujari | कु्ख्यात गुंड रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत कोठडी, विशेष मोक्का न्यायालयाचा निर्णय
Continues below advertisement
दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफिकेतील सेनेगलमधून प्रत्यार्पण करुन भारतात आणलेल्या गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळविण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले आहे. बंगळुरु येथील न्यायालयाने कोठडी मंजूर केल्यामुळे गुन्हे शाखेचे पथक कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेऊन आज सकाळी मुंबईत दाखल झाले. रवी पुजारीला नऊ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.
रवी पुजारी याच्यावर मुंबईत सुमारे 49 गुन्हे दाखल असून अनेक बड्या आणि प्रसिद्ध व्यक्तींना त्याने खंडणीसाठी धमकावले आहे. त्याचा ताबा मिळाल्याने मुंबई पोलिसांना मिळाल्याने अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रवी पुजारीवर कर्नाटकात आणि महाराष्ट्रात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची एकेकाळी सिनेमा आणि व्यापारी जगतात मोठी दहशत होती.