Mumbai Police Commissioner | मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची ओळख | ABP Majha
Continues below advertisement
विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर परमबीर सिंह यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंह 1988 च्या आयपीएस बॅचचे आधिकारी आहेत. याआधी परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते. महाराष्ट्रातील 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळाप्रकरणातील मुख्य आरोपी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पहिली क्लीन चिट देणारे परमबीर सिंहच होते. परमबीर सिंह यांच्या नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी बिपीन के सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Continues below advertisement