परमबीर सिंह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय

Continues below advertisement

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहखात्याला अहवाल पाठवला असून यात परमबीर सिंह यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. एपीआय सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आला. तसंच तत्कालीन पोलीस सहआयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमबीर सिंह यांनी त्यांची नियुक्ती केली, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

सचिन वाझे सर्वसाधारण सहाय्यक पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना रिपोर्ट करायचे. इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते रिपोर्ट करायचे नाहीत. विविध हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास परमबीर सिंह यांच्या सांगण्यानुसार सचिन वाझेंकडे‌ देण्यात आला होता. सचिन वाझेंच्या टीममधल्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती. 

हायप्रोफाईल प्रकरणात‌ मंत्र्यांच्या ब्रिफिंग वेळी परमबीर सिंह यांच्याबरोबर सचिन वाझेसुद्धा हजर राहायचे. सरकारी गाड्या उपलब्ध असताना सचिन वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनांनी कार्यालयात यायचे, असं गृहखात्याला पाठवलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram