Lockdown | घरी जाण्यास सांगितल्याने मुंबईतील गोवंडीत टोळक्याची पोलिसांना मारहाण
एकीकडे कोरोना ला रोखण्यासाठी पोलीस दिवस रात्र एक करुन संचारबंदी योग्य पद्धतीने लागू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे या कायदा पाळायला लावला म्हणून पोलिसांना मारहाणीला सामोरे जावे लागत आहे. काल रात्री गोवंडीच्या शिवाजी नगर भागात संचारबंदी असताना ही लोक बिनधास्त रस्त्यावर फिरत होते. या लोकांना पोलिसांनी घरी जाण्यास सांगितले असता एक टोळक्याने पोलिसांना शिवीगाळ करत बांबूने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी वाजिद शेख आणि सलमान नामक दोन जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे.