Antilia bomb scare case : अँटिलिया संशयास्पद कार प्रकरणी एक जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात

उद्योगपती मुकेश अंबांनींच्या अँटिलियाचा पत्ता विचारणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आलंय. एका गुजराती टूरिस्ट टॅक्सी चालकाला मुंबई पोलिसांनी नवी मुंबईतून ताब्यात घेतलंय. सुरुवातीच्या तपासात या व्यक्तीकडे काहीही संशयास्पद आढळलं नसल्याची माहिती मिळतेय. 
दोन संशयास्पद व्यक्तींनी मुकेश अंबानींच्या निवासस्थानाचा पत्ता विचारला अशी माहिती टॅक्सी ड्रायव्हरनं पोलिसांना दिली. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये टॅक्सी चालकाने फोन करुन माहिती दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एका कारमधून आलेल्या दोघांनी अंबानींच्या निवासस्थानाचा पत्ता विचारला, ते दोघे उर्दू भाषेत बोलत होते असं या टॅक्सी चालकानं पोलिसांना माहिती देताना म्हटलं होतं. यानंतर अँटिलियाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती.

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola