Mumbai Bank Robbery: SBI बँकेतील दरोड्या प्रकरणी पोलिसांची कारवाई, दोन आरोपींना पाच तासात अटक
मुंबईतील दहिसर पश्चिम परिसरात दिवसाढवळ्या एसबीआय बँकेमध्ये आरोपीने दरोडा टाकला होता यामध्ये दोन आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच तासांमध्ये अटक केली आहे . या दोन्ही आरोपीला दहिसर मधूनच अटक करण्यात आले आहे, हे दोन्ही आरोपी मूळचा उत्तर प्रदेश मधले राहणारे आहेत .हे दोघे भाऊ असल्याचे समोर आले आहे .यातील एक आरोपी दहिसर मध्ये भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करतो. तर चुलत भाऊ याला 12 तारखेला उत्तर प्रदेश मधून बोलवण्यात आले होते. बंदूक देखील बिहार मधून आणली आहे असे आरोपीने सांगितले आहे .2 लाख च्या रक्कम सह पिस्टल पोलिसांनी हस्तगत केली आहे .