Mumbai Plastic Ban : पालिकेची प्लास्टिकविरोधात कारवाई, 13 लाखांचा दंड वसूल : ABP Majha
Continues below advertisement
मुंबई महापालिकेने केलेल्या प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाईत पाच दिवसांत सहा हजार १८ ठिकाणी छापे मारून ५९३.३०५ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. या कालावधीत १३ लाखांचा दंड वसूल केला असून १६८ जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याविरोधातील मोहीम २५ ऑगस्टपासून अधिक तीव्र करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितलंय. २५ हजारांपर्यंत दंड उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील आणि अविघटनशील कचरा अधिनियम २००६ च्या कलम ९ नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये आणि त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास व २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे.
Continues below advertisement