Mumbai : अंधेरी लोखंडवाला परिसरात पाईपलाईन फुटून गळती, बीएमसीकडून उडवाउडवीची उत्तरं, मनसे आक्रमक

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी लोखंडवाला परिसरात पाणीपुरवठा करणारी मुंबई महापालिकेची जलवाहिनी फुटून मागील दहा दिवसांपासून गळती सुरू आहे. त्यातून लाखो लीटर पाणी दररोज वाया जात आहे. यासंदर्भात मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी मुंबई महापालिकेच्या जलअभियंत्याकडे तक्रारही केली. पण कर्मचाऱ्यांची उपलब्धता होईल तेव्हा जलवाहिनीची दुरुस्ती करु अशी उडवाउडवीची उत्तरं त्यांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळं आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई महापालिकेनं जलवाहिनीची तातडीनं दुरुस्ती करुन पाणीगळती रोखावी. तसंच उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं, मुंबई महापालिकेच्या पश्चिम प्रभाग कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा मनसेनं दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola