Pankaja Munde | वरळीतील कार्यालयातून पंकजा मुंडे राज्यातील जनतेच्या समस्या सोडवणार | ABP Majha
Continues below advertisement
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या वरळीतील कार्यालयाचं उद्घाटन आज करण्यात आलं. याच कार्यालयातून पंकजा मुंडे आता राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. बीडमध्ये घेतलेल्या मेळाव्यात पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालयातून कारभार हाकणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर दोन वेळा हे उद्घाटन पुन्हा पुढे ढकलण्यात आलं होतं. आज मराठवाड्यातील नेत्यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन पार पडलं.
Continues below advertisement