Earthquake | डहाणू, तलासरी पुन्हा भूकंपाने हादरले, कोरोनासोबत दुहेरी संकटाने नागरिक भयभीत

Continues below advertisement
 पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात 2018 पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. मध्यंतरी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र गेल्या महिना भरापासून पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे.
काल रात्री 10 वाजून 33 मिनिटांनी 2.8, 11 वाजून 41 मिनिटांनी 4.0 तर 12 वाजून 05 मिनिटांनी 3.6 असे रिश्टर स्केलचे धक्के बसले. डहाणू, तलासरी परिसराला भूकंपाचे जवळपास सात ते आठ हादरे बसले. हे धक्के तलासरी,आणि डहाणू तालुक्यातील तलासरी, दापचरी, आंबोली, धानीवरी, ओसारविरा, कासा, बोर्डी, धुंदलवाडी, शिशने परिसरात जाणवले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram