Mumbai Night curfew | नाईट कर्फ्यूला मुंबईत प्रतिसाद; मुंबईच्या रस्त्यांवर तुरळक गर्दी
Continues below advertisement
राज्यातील सर्व शहरांमध्ये मंगळवारपासून नाईट कर्फ्युला सुरुवात करण्यात आली आहे. रात्री 11 ते 6 वाजेपर्यंत कोणत्याही नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. कालपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील मुख्य शहरांत पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
Continues below advertisement