Mumbai Corona | चिंता वाढली; मुंबईत नव्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ
मुंबईतही कोरोनाचा थैमान सुरुच आहे. मागील सहा महिन्यांत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळले. धारावी, माहिम, दादर येथेही कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. धारावीमध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता प्रशासनासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी इथं नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू लागला आहे.