Narendra Mehta | माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा भाजपला रामराम | ABP Majha

माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकलाय.
आपल्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा व्हिडिओ प्रसारित करून त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय.
२६ फेब्रुवारीला मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. मिरा-भाईंदर शहरात भाजपचा एक मेहता गट तर दुसरा विद्यमान आमदार गीता जैन यांचा गट आहे. यात मेहता यांनी सुचवलेल्या नावांना फाटा देत भाजपनं महापौरपदासाठी ज्योत्स्ना हसनाळे यांचं नाव पुढे केलंय. तर उपमहापौरपदासाठी मदन सिंह आणि हसमुख गहलोत यांचे अर्ज दाखल केलेत.
त्यामुळे मेहतांनी भाजपमधून पदांचा राजीनामा दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola