Mumbai Rains: मुंबई महापालिकेकडून क्रांती नगरमधील नागरिकांचं स्थलांतर करण्यास सुरूवात
Continues below advertisement
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील दोन ते तीन तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.मुंबईसह उपनगरात आज मान्सूनचं दमदार आगमन झालंय. पहिल्याच पावसाने शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.
Continues below advertisement