Maharashtra Lock Down | महाराष्ट्र लॉकडाऊन तरीही मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा
Continues below advertisement
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केला, मात्र मुंबई लोकांनी कायद्याचं उल्लंघन करुन घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळतं. सकाळी 9 वाजच्या सुमारास मुंलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मात्र, गर्दी कमी करण्यासाठी टोल नाक्यावरुन वाहनांना मुंबईच्या दिशेनं तात्काळ सोडण्यात आलं. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातंय, मात्र, मुंबईत याचं पालन होताना दिसत नाही.
Continues below advertisement